पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील तापमानाने बुधवारी (दि.१२) रोजी यंदाच्या उन्हाळ्यातील तापमानाचा उच्चांक गाठला आहे. बुधवारी शहरात ४१ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्यावर्षी २८ एप्रिल रोजी ४३ अंश उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. हळूहळू तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे.

दिवसेंदिवस जाणवणाऱ्या तीव्र उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात – गेल्या काही दिवसांपासून ३८ ते ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे दिवसेंदिवस होणाऱ्या उकाड्यात घट होण्याऐवजी वाढ होत असल्याने नागरिकांना उकाड्यातून काही दिलासा मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी तापमानाने उच्चांक गाठला असून पिंपरी- चिंचवडमध्ये ४१ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

तापमानात होणाऱ्या वाढीने अंगाची काहीली आणि बेचैनी निर्माण होत आहे. उन्हात फिरणाऱ्या नागरिकांना डोकेदुखी, चक्कर, मळमळ आणि उलटीचे त्रास जाणवत आहेत.
उन्हापासून संरक्षण म्हणून टोपी, छत्री, गॉगल घेतले तरी उन्हात फिरताना उन्हाचे चटके जाणवत आहेत. त्यामुळे उन्हात रस्त्यावर गर्दी कमी होऊ लागली आहे. वाढलेल्या तापमानाच्या पायामुळे फॅनची हवादेखील गरम जाणवत आहे. दिवस अन रात्रीही घामाघूम झालेले नागरिक थंडावा मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.
Tags: Pcmc news




















Join Our Whatsapp Group