पिंपरी (Pclive7.com):- भरधाव कारने धडक दिल्याने सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ११) दुपारी पावणेपाचच्या सुमारास नेहरूनगर, पिंपरी येथील रसरंग चौकात घडली. शिवाजी रावसाहेब काकडे (वय ७) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

याप्रकरणी रावसाहेब आण्णा काकडे (४१, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ऑडीकार (MH14-CM-9595) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मजुरी काम करतात. दरम्यान, त्यांचा मुलगा शिवाजी हा रस्त्यालगत असलेल्या झाडाखाली खेळत होता. त्या वेळी भरधाव आलेल्या कारने त्याला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group