पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये आणखी इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक झाली आहे. संत तुकारामनगर मधील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयासमोर ही घटना घडली आहे. आज सकाळी साडे आठच्या सुमारास अचानक या दुचाकीने पेट घेतल्यानं एकच गोंधळ उडाला.

दुचाकीने पेत घेतल्यानंतर तातडीनं सर्वांनी तिथली वाहनं बाजूला घेतली. काही क्षणातच संत तुकारामनगर येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागल्याचा अंदाज आहे. यापूर्वी देखील इलेक्ट्रिक वाहनांनी पेट घेतल्याच्या घटना घडल्या आहेत.
























Join Our Whatsapp Group