पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड युवासेना शहरसंघटकपदी निलेश हाके यांची निवड करण्यात आली. युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक ह्यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळेस युवासेना सचिव किरण साळी, पश्चिम महाराष्ट्र युवासेना सचिव ऋतुराज क्षीरसागर, विस्तारक सिद्धू अभंगे, युवा सेना कॉलेज कक्षा सचिव रुपेश कदम, युवती सेनेच्या शर्वरी गावंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना शहरप्रमुख निलेश तरस उपस्थित होते.
पिंपरी युवासेनाप्रमुख निलेश हाके यांची कार्याची दखल घेत महासंसद रत्न खासदार श्रीरंग बारणे व पश्चिम महाराष्ट्र युवा सेना सचिव विश्वजीत बारणे यांच्या मार्गदर्शनाने युवा सेनेचा संघटन मजबूत करेल. तसेच हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्याप्रमाणे ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण करत. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व महिला वर्गांच्या रिकाम्या हातांना नोकरी उद्योग धंद्यासाठी प्राधान्य देण्याचे काम करेल करेल असे प्रतिपादन नवनियुक्त पिंपरी चिंचवड शहर संघटक निलेश हाके यांनी केले.























Join Our Whatsapp Group