पिंपरी (Pclive7.com):- भापजचे जेष्ठ नेते आणि पिंपरी चिंचवड माजी विरोधी पक्षनेते अमृत सोमाजी पऱ्हाड (वय – ६५) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे एक पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन वेळा नगरसेवक असलेले अमृत पऱ्हाड हे अत्यंत अभ्यासू असे फर्डे वक्ते होते. भाजपचे दिवंगत तत्कालीन अध्यक्ष कै. अंकुश लांडगे यांच्या काळात त्यांनी पालिका सभागृह गाजवले होते.