पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर उपलब्ध लसीच्या साठ्यानुसार वय वर्षे १८ व पुढील नागरिक यांना ‘इन्कोव्हॅक’ लसीचा प्रिकॉशन डोस (ज्यांना कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लसीच्या दुस-या डोसनंतर ०६ महिने किंवा २६ आठवड्याचा कालावधी पुर्ण झालेला आहे.) ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप या पध्दतीने नाकावाटे देण्यात येणार आहे. या अनुषंगाने शासनाने निर्गमित केलेल्या निकषानुसार लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल. ‘इन्कोव्हॅक’ लसीचा प्रिकॉशन डोस उद्या दि.२१ डिसेंबर २०२३ ते दि.२२ जानेवारी २०२४ या कालावधीत महापालिकेच्या आठ केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची फक्त ‘इन्कोव्हॅक’ लसीकरणासाठी निश्चित केलेली लसीकरण केंद्रे खालील प्रमाणे..!
१. अ प्रभाग – कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी. – २० डोस.
२. ब प्रभाग – क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले (जुने तालेरा) रुग्णालय चिंचवड. – २० डोस.
३. ड प्रभाग – नवीन थेरगांव रुग्णालय, थेरगाव. – २० डोस.
४. इ प्रभाग – नवीन भोसरी रुग्णालय, भोसरी. – २० डोस.
५. फ प्रभाग – यमुनानगर रुग्णालय. – २० डोस.
६. ग प्रभाग – नवीन जिजामाता रुग्णालय. – २० डोस.
७. ह प्रभाग – अहिल्यादेवी होळकर सांगवी मनपा शाळा. – २० डोस.
८. ह प्रभाग – कै.यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, कुटुंब कल्याण विभाग, रुम नं.६२. – २० डोस.
सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी- ९.३० ते सायं. ४.३० या कालावधीत करण्यात येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग, जेष्ठ नागरिक, तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. सदर च्या ‘इन्कोव्हॅक’ कोविड १९ लसीचा पहिला व दुसरा डोस कोणत्याही लाभार्थ्याला देण्यात येणार नाही.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने लसीकरण करण्यात येईल. लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे दर रविवारी बंद राहतील.
यापुढे लसीकरण केंद्रामध्ये बदल असल्यास वार्तापत्र प्रसिध्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल तोपर्यंत पुर्वी प्रसिध्द केलेले वार्तापत्र ग्राह्य धरण्यात यावे व त्यानुसार पिं.चिं.म.न.पा.लसीकरण केंद्रावर कार्यवाही करण्यात येईल. तसेच नागरिकांना सदरचे वार्तापत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.























Join Our Whatsapp Group