पिंपरी (Pclive7.com):- श्री दत्त जयंती निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मोशी येथे अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. बुधवार दि.२० ते २७ डिसेंबर या सात दिवसांमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे. या सात दिवसांमध्ये पाचवा वेद समजला जाणारा श्री गुरुचरित्र ग्रंथ या ग्रंथाचे पारायण करण्यात येत आहे. पारायणासाठी १२५१ सेवेकरी आपली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करत आहेत.
तसेच दिवस रात्र प्रहरे सेवा व विविध प्रकारचे यज्ञ याग सेवा संपन्न होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने श्री गणेश याग, रुद्र याग, मल्हारी याग, चंडीयाग, स्वामी याग, मनोबोधक याग, यासारखे अतिउच्च कोटीची सेवा संपन्न होत आहे अशी माहिती बाळासाहेब गजे, मनीषा आल्हाट, अनिल दिघे, अरविंद वारकर, सुशील बारस्कर, रोहिणी आल्हाट यांनी दिली.
























Join Our Whatsapp Group