पिंपरी (Pclive7.com):- केंद्र शासनाच्या दुरसंचार विभागाने चालु केलेल्या सीईआयआर या पोर्टलवर हरविलेले मोबाईल रजिस्टर करुन ब्लॉक केल्यानंतर ते मोबाईल पुन्हा वापर झाल्यास संबंधीत तक्रारदार व स्थानिक पोलीस स्टेशन यांना वापरकर्त्यांची सविस्तर माहिती उपलब्ध होते. त्यानंतर संबंधित वापरकर्त्यांचा शोध घेवुन हरविलेले मोबाईल जप्त करण्यात येतात. अशाप्रकारे चिंचवड पोलीस स्टेशन मार्फत एकुण ३० मोबाईलची माहिती प्राप्त झाल्या नंतर संबंधीत वापरकर्त्यांकडुन एकुण ६ लाख सात हजार रुपये किंमतीचे ३० मोबाईल जप्त करण्यात आलेले होते. हे ३० मोबाईल आज पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१ विवेक पाटील यांच्या हस्ते संबंधित मुळमालकांना परत देण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी विवेक पाटील पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१ यांचे मार्गदर्शनाखाली, विशाल हिरे सहा. पोलीस आयुक्त, चिंचवड विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिंचवड पोलीस ठाणे, प्रकाश जाधव पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोलीस नाईक सचिन सोनपेटे, पोलीस हवालदार भाग्यश्री जमदाडे, पोलीस शिपाई मोहन वरळे यांनी केलेली आहे.
पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले की, तुमचा मोबाईल हरविला असल्यास तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला जावुन हरविलेल्या मोबाईलची तक्रार देवुन केंद्र शासनाच्या सीईआयआर या पोर्टलवर माहिती भरुन मोबाईल ब्लॉक केलेनंतर त्याचा पुर्नवापर झाल्यास त्याची माहिती संबंधित पोलीस स्टेशन मिळताच तो मोबाईल पोलीसांकडुन जप्त केला जातो.























Join Our Whatsapp Group