पिंपरी (Pclive7.com):- यंदाच्या वर्षातील पहिला स्वाईन फ्लूचा रूग्ण पिंपरी चिंचवड शहरात आढळला आहे. शहरातील एका खाजगी रूग्णालयात त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. गेल्यावर्षी तब्बल ६१ जणांचा स्वाईन फ्लूने बळी घेतला होता.
गेल्या काही दिवसांपासून बदलत्या वातावरणामुळे स्वाईन फ्लूने पुन्हा आपलं डोकं वर काढले आहे. शहरवासियांसाठी हा चिंतेचा प्रश्न झाला आहे. गेल्या वर्षी तब्बल ६१ जणांना स्वाईन फ्लूने आपला जीव गमवावा लागला होता. यावर्षी १ जानेवारी २०१८ पासून शहरातील विविध रूग्णालयात ८७ हजार १८२ जणांनी तपासणी केली. त्यातील ४२७ जणांना टँमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या. तर आज दि.२५ नोव्हेंबर रोजी स्वाईन फ्लू निष्पन्न झालेला एक रूग्ण आढळला आहे. पिंपरीतील एका खाजगी रूग्णालयात त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.