पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चिंचवड विधानसभेचे कार्याध्यक्ष संजय कातळे यांनी आज शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, शहर उपाध्यक्ष महेश इंगवले पाटील, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे उपस्थित होते.
पक्ष प्रवेशानंतर संजय कातळे म्हणाले की, शरदचंद्र पवार यांचे विचार तळा- गळातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व जनतेची अडकलेली कामे व प्रश्न सोडवण्यासाठी शहर अध्यक्ष तुषार कामठे यांच्या साथीने मी काम करणार आहे. जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळावी म्हणून मी तुतारी हाती घेतली आहे.