पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील शाळांची यांत्रिकी पद्धतीने दैनंदिन साफसफाईच्या निविदेमध्ये २५ कोटींचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केला आहे.

सुलभा उबाळे यांनी म्हटले आहे की, महापालिका शाळांची यांत्रिकी पद्धतीने दैनंदिन साफसफाई करण्याच्या निविदे मध्ये तब्बल २५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. या संदर्भात उबाळे यांनी दिनांक १२/०८/२०२४ रोजी ही निविदा चुकीच्या पद्धतीने महापालिका ब्रिक्स कंपनीला देत असल्याचे पत्र आयुक्त शेखर सिंह यांना दिले होते. तरी देखील आजच्या स्थायी समितीमध्ये आयुक्त या विषयाला मंजुरी देणार असल्याची माहिती मिळत आहे. ब्रिक्स कंपनीची ईडी मार्फत चौकशी सुरु आहे. असे असताना अश्या कंपनीला काम देण्याचा आयुक्तांचा कोणाच्या दबावाखाली अट्टाहास आहे? यामुळे मनपाचे २५ कोटीचे नुकसान होणार आहे. मागील निविदेपेक्षा या निविदेत १० कोटी रुपये वाढवले आहेत. जे कि मागची निविदा दोन वर्षासाठी ३४ कोटी होती. आताची निविदा तीन वर्षासाठी ६१ कोटीची आहे, जी की ५१ कोटीची असणे अपेक्षित होते. त्यावर आपण १३.९५%जास्त दराची निविदा प्राप्त झाली आहे. आणि पात्र असतानाही अपात्र केलेल्या सुमित फॅसिलिटी कंपनी यांनी १०% कमी दराने काम भरल्याचे समजते म्हणजे आयुक्तांनी मनपाचे २५ कोटीचे आर्थिक नुकसान केले असल्याचे सुलभा उबाळे यांनी म्हटले आहे.
सद्यस्थितीत काम करणाऱ्या सिंग इंटेलिजन्स यांनाही आरोग्य विभाग व आयुक्तांनी अपात्र केले आहे. प्रशासक असताना मनपाच्या पैशाचा अपव्यवहार करणे हा एक गुन्हा आहे. याची दाद आम्ही वेळप्रसंगी कोर्टात, आर्थिक गुन्हे विभागात मागू याची प्रशासनाने नोंद घ्यावी.
आयुक्तांनी त्वरित पात्र कंपन्यांना पात्र करून जो कोणी लघुत्तम असेल त्याला काम देऊन मनपाचे आर्थिक नुकसान थांबवावे अथवा निविदा रद्द करावी अशी भूमिका व याबाबत जाब विचारण्यासाठी आज (दि.११) महाविकास आघाडीचे नेते अजित गव्हाणे, रवी लांडगे हे सुद्धा महापालिकेत आयुक्तांच्या दालना बाहेर उपस्थित होते. परंतु आयुक्त शेखर सिंह हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना घाबरून पळ वाटाणे आजच्या स्टँडिंग कंमेटी मध्ये हा विषय पास करून करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करत आहेत असा आरोप शिवसेना महिला संघटिका सुलभा उबाळे यांनी केला आहे.






















Join Our Whatsapp Group