पिंपळे सौदागर (Pclive7.com):- विजयादशमी निमित्ताने नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन यांच्या सौजन्याने पिंपळे सौदागर याठिकाणी पिंपरी-चिंचवड, पुणे शहरातील सर्वात भव्य दिव्य असा रावण दहन कार्यक्रम आज (दि.१२) संपन्न होणार आहे.

यंदाचा विजयादशमी कार्यक्रम पिंपळे सौदागरच नव्हे तर संपूर्ण शहरासाठी आकर्षक ठरणार आहे. यावेळी कार्यक्रमात तरुणाईला वेड लावलेल्या गुलाबी साडी गाणं फेम प्राजक्ता घाग, बॉईज-३ फेम अभिनेत्री विदुला चौघुले, बॉईज-२ फेम अभिनेत्री पल्लवी पाटील, अभिनेत्री मोहिनी अवसरे आणि मुळशी पॅटर्न फेम प्रसिद्ध अभिनेते रमेश परदेशी (पिट्ट्या भाई) हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे.

तसेच याठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. यावेळी विजयादशमी निमित्ताने आयोजित या रावन दहन कार्यक्रम मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group