चिंचवड (Pclive7.com):-चिंचवड विधानसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.८० टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.
पिंपळे सौदागर परिसरात सकाळी सात वाजल्यापासून मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. नऊ वाजेपर्यंत ६.८० टक्के एवढे मतदान झाले आहे.
पुरुष :- २७१६४
स्त्री :- १७९७४
इतर :- ००
एकूण :- ४५१३८
टक्केवारी :- ६.८०