पिंपरी (Pclive7.com):- भागीदारीचे आश्वासन देऊन मालमत्तेचे अधिकार व आयपी हक्कांचा गैरवापर करून साडेसहा कोटी रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार देहू-मोशी रोड येथे घडला आहे.

अविनाश बेलगमवार, आकाश बेलगमवार (दोघेही रा. देहू-मोशी रोड, विठ्ठलनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. नित्यानंद करुपय्या थेवर (वय ४८, रा. सुखवानी प्रेसीडेन्सी, मोरवाडी, पिंपरी) यांनी बुधवारी (दि. ४) याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २००० ते २०१० या कालावधीत घडली. झेवीऑन मोबिलिटी इलेक्ट्रिक प्रा. लि. व ज्योती सोल्युशन वर्क्समध्ये मालमत्तेच्या हस्तांतरावरून फसवणूक झाली.

आरोपींनी भागीदारीचे बनावट आश्वासन देत महत्त्वाचे आयपी अधिकार व डाय खरेदी फिर्यादी यांच्याकडून घेत कंपनीच्या उत्पादनासाठी वापरत तब्बल साडेसहा कोटींची फसवणूक केली. भोसरी एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.