पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ (पिंपळे निलख – विशाल नगर – कस्पटे वस्ती) परिसरात शरद गायकवाड यांनी “होम टू होम” प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. या प्रचारादरम्यान त्यांनी घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तीव्र इच्छुक असलेले शरद गायकवाड यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्यामुळे नागरिकांमध्ये चांगली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आणि जनसंपर्कामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात असल्याची चर्चा परिसरात आहे.

या प्रचाराच्या निमित्ताने शरद गायकवाड यांनी पिंपळे निलख प्रभागाचा कायापालट करणारा विकासात्मक जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, तो जाहीरनामा घरोघरी पोहोचवत नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेत आहेत. पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक, शिक्षण, आरोग्य व मूलभूत नागरी सोयीसुविधांवर भर देणारा हा जाहीरनामा मतदारांचे लक्ष वेधून घेत आहे.

पंचशीलनगर, क्रांती नगर, गणेशनगर, कस्पटे वस्ती, पीसीएमसी स्कूल परिसर, मानकर चौक, छत्रपती चौक आदी भागांमध्ये त्यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. या दौऱ्यादरम्यान ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद दिले, तर तरुणांनी सक्रिय पाठिंबा जाहीर करत उत्साहाने सहभाग नोंदवला. “होम टू होम” प्रचारामुळे शरद गायकवाड यांचा जनसंपर्क अधिक दृढ होत असून, प्रभाग क्रमांक २६ मध्ये त्यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.






















Join Our Whatsapp Group