पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील डॅफोडील्स प्रि स्कुलच्यावतीने शाळेतील लहान मुलांनी व शाळेतील शिक्षकांनी नाना काटे सोशल फाउंडेशनच्या ‘नो प्लास्टीक’च्या उपक्रमाचे स्वागत केले.
पर्यावरण पूरक कागदी वृत्तपत्राच्या पिशव्या बनवून ‘नो प्लास्टिक’ असा जनजागृतीपर संदेश देवुन रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील छोटे मोठे व्यवसायिक व दुकानदार यानां लहान मुलांनी स्वत: बनवलेल्या कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. नगरसेवक नाना काटे यांनी त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत करून मुलांना शुभेच्छा दिल्या व लहान मुलाचे कार्य कौतुकास्पद आहे. तसेच रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील इतर शाळांनी ह्या उपक्रमांत भाग घ्यावा असे आव्हान यावेळी करण्यात आले. यावेळी डॅफोडील्स प्रि स्कुलच्या मुख्याध्यापिका आरती कुर्रा, शिक्षिका मीनल कशमा, श्वेता माथुर आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group