पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर युवती प्रमुखपदी तेजस्विनी चंद्रकांत कदम यांची नियुक्ती शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी नुकतीच केली आहे. यावेळी आमदार महेश लांडगे, जेष्ठ नेते आझमभाई पानसरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, युवा मोर्चा प्रदेश सचिव अनुप मोरे, प्रवक्ते अमोल थोरीत आदी मान्यवर उपस्थित होते.
तेजस्विनी कदम या हॉटेल व्यावसायिक असून अनुष्का स्त्री मंचच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहेत. आगामी काळात महाविद्यालयीन स्तरावर युवतींचे संघटन भाजपा माध्यामातुन करणार आहेत.






















Join Our Whatsapp Group