पिंपरी (Pclive7.com):- आळंदी रोडवरील वडमुखवाडी येथील साई मंदिरात श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त 10 ते 19 ऑक्टोंबर दरम्यान श्री साईबाबा महासमाधी शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांसह जागतिक स्तरावरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवातील मुख्य कार्यक्रम रविवारी (दि. 14) होणार आहेत. महोत्सावाचे उद्घाटन देखील रविवारी सायंकाळी पाच वाजता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या होणार आहे, अशी माहिती श्री साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या महोत्सावाचे उद्घाटन रविवारी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग, केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश बापट, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर राहुल जाधव, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे उपस्थित राहणार आहेत. यावेळी सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणा-यांचा गौरव केला जाणार आहे. माण तालुक्यातील खटाव हे गाव सुजलाम् सुफलाम् करणा-यांचा सन्मान केला जाणार आहे.
सुभाष नेलगे यांनी सांगितले की, 10 ते 19 ऑक्टोंबर दरम्यान श्री साईबाबा महासमाधी शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येत आहे. महोत्सावाचा मुख्य कार्यक्रम रविवारी (दि.14)रोजी आहे. रविवारी सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पाच वाजता श्रींची काकडा आरती होणार आहे. त्यानंतर श्री साई सत्चित्र ग्रंथाचे अखंड पारायण होणार आहे. श्रींचे मंगलस्नान, पादुका पूजन, आरती व दर्शन होणार आहे. दुपारी 12 वाजता मध्यान आरती होणार आहे. दुपारी एक ते पाच या वेळेत भजन होणार आहे. सांयकाळी साडेपाच वाजता दिपप्रज्वलन, प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन होणार आहे. डॉ. चंद्रभानू सत्पथी यांच्या उपस्थितीत देश-विदेशातील साईभक्त महोत्सवात सहभागी होणार आहेत.
साई बाबांच्या कुटुंबातील व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. बाबांचे कार्य पुढे चालू ठेवणा-यांचा तसेच समाजिक कार्यात भरिव योगदान देणा-यांचा देखील गौरव केला जाणार असल्याचे, नेलगे यांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group