पिंपरी (Pclive7.com):- रावेत येथील फर्निचर व्यापाऱ्यावर बिश्नोई गँगच्या नावाने करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात अराजू बिश्नोई याच्याशी संबंधित असलेल्या तिघांना उत्तराखंडमधून अटक करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रवीण राम निवासे (वय २३, हरियाणा), पंकज कुलदीप रहाठी (वय २१, हरियाणा) आणि सागर अजय पाल (वय २१, हरियाणा) यांचा समावेश आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींना उत्तराखंडमधून ताब्यात घेण्यात आले असून त्यांना रात्री उशिरा पुण्यात आणण्यात येणार आहे. या प्रकरणात आणखी काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे.





















Join Our Whatsapp Group