पिंपरी (Pclive7.com):- हिंदू साम्राज्य दिनाचे औचित्य साधत सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, संकल्प सोशल फाउंडेशन आणि सकल हिंदू समाज तुळजाभवानी वस्ती रावेत यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २४ मे २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे रक्तदान शिबिर रविवार दि. २४ मे २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून, खांदेश तिळवण तेली समाज मंडळ, एस. बी. पाटील रोड, रावेत येथे हे शिबिर पार पडणार आहे.

रक्तदान हेच श्रेष्ठ दान मानले जात असून, समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांकडून प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देखील देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दीपक बोराडे – ७०८३१५१२८०, दादा वाघ – ९५५२२८०१३७, अनिकेत दास – ८४१२९०६६७८, शंकर रेड्डे – ९१७२९३८५३९ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group