पिंपरी (Pclive7.com):- देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात आले. या अभियानांतर्गत भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर जिल्हा सचिव श्री. जालिंदर महादेव काटे यांच्या पुढाकारातून नागरिकांना NCMC कार्डचे वाटप करण्यात आले.

नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी तसेच विविध सार्वजनिक सुविधांचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या NCMC कार्डची माहिती देत त्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक, महिला, बंधू-भगिनी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमास भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव श्री. अजितदादा कुलथे तसेच भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष श्री. दिनेश भाऊ यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शक भरत अण्णा काटे, श्री. मच्छिंद्र काटे, मारुती काटे, कालिदास ढवळे यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा आणि सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याच भावनेतून पिंपरी-चिंचवड शहरातही युवा मोर्चाच्या माध्यमातून नागरिकांच्या उपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ‘सेवा हीच संघटनेची ओळख’ या भावनेतून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून त्यांना आवश्यक सुविधा व माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या अभियानाच्या माध्यमातून करण्यात आला.
या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत NCMC कार्डचा लाभ घेतला. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित उपयुक्त उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जालिंदर महादेव काटे, सचिव, भारतीय जनता युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा यांनी उपस्थितांचे आभार मानले.




















Join Our Whatsapp Group