पिंपरी (Pclive7.com):- कृष्णानगर चौक पोलिस लाईन परिसरात आज सिग्नलचा खांब अचानक रस्त्यावर कोसळल्याने आकुर्डीकडे जाणारा एक मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता.

सिग्नलचा खांब रस्त्यावर पडल्याने सुरक्षेच्या कारणास्तव आकुर्डीकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून सध्या एकाच मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना सावधगिरीने वाहन चालविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या.

दरम्यान, कोसळलेला सिग्नलचा खांब हटविण्याचे काम पोलिस आणि संबंधित यंत्रणांकडून तातडीने हाती घेण्यात आले असून मार्ग लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


















Join Our Whatsapp Group