पिंपरी (Pclive7.com):- अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट ४ ने अटक केली आहे. या सराईत आरोपीवर १३ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून गेल्या चार वर्षांपासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते, अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार यांनी दिली आहे.

नारायण सोपान दाभाडे (वय ४१, रा. जांभुळगाव, व्हिजन सिटी, फ्लॅट नंबर ३०४, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. नारायण दाभाडे गेल्या चार वर्षांपासून फरार होता. त्याच्यावर यापूर्वी मोका, खुनाचा प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, मारामारी, अग्निशस्त्राचा वापर, ज्वेलर्सचे दुकान लुटण्याचा कट, गांजा विक्री असे एकूण १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या आरोपीची तळेगाव दाभाडे परिसरात मोठी दहशत आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिलेल्या सुचनांनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारने फरार आरोपीस शोधण्याची मोहीम तीव्र केली. तांत्रिक विश्लेषणात्मक तपास करून गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती काढून आरोपीस जांभुळगाव येथून तपास पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिलेल्या सुचनांनुसार पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे (१) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस अंमलदार असवले, सोनटक्के, मुंडे यांनी केली.


















Join Our Whatsapp Group