पिंपरी (Pclive7.com):- जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे CRPF जवानांच्या गाडीवर झालेल्या भ्याड दहशदवादी हल्ल्यामध्ये शहिद झालेल्या जवानांना कष्टकरी कामगार पांचयत वतीने पिंपरी येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पिंपरी येथील महात्मा फुले पुतळा येथे श्रध्दांजली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कष्टकरी महिला पुरुषांनी मेणबत्ती प्रज्वलित करून शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच दहशतवाद्यांकडून झालेल्या या हल्याचा जाहीर निषेध करण्यात आला. शहिद जवान अमर रहे, भारत माता कि जय, भ्याड हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा धिक्कार असो.. अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, कार्याध्याक्ष बळीराम काकडे, कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, संदिपान झोंबाडे, विक्की तामचिकर, सविता लोंढे, मंगल जाधव, रेशमा काळे, सुशिला मोरे, कमल घोडके, मंगल कांबळे आदी उपस्थीत होते.






















Join Our Whatsapp Group