पिंपरी (Pclive7.com):- नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने डॉक्टरांच्या घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत इंसाइट पुरस्कृत भोसरी संघाने विजेतेपद पटकावले. तर चिंचवड उपविजेता संघ ठरला.
निमा आयोजित क्रिकेट स्पर्धेत भोसरी (एबीसीडी) संघाने सलग तीन वेळा विजेतेपद पटकावले. बक्षीस वितरण प्रसंगी निमाचे सचिव डॉ अभय तांबीले, खजिनदार डॉ. रमेश केदार, विमा प्रमुख डॉ. प्रज्ञा खोसे, इंसाइट ऑप्थल्मॉलॉजी इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. अभिजीत आग्रे, निमाचे क्रीडा प्रमुख डॉ. संजीव पाटील, आळंदी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विकास पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी मॅन ऑफ दि सिरीज व बेस्ट बॅटसमनचा किताब डॉ. रौनक महाजन यांना मिळाला. मॅन ऑफ द मॅचचा किताब अमृत पेरणे यांना देण्यात आला. डॉ. दीपक चौधरी हे बेस्ट बॉलर ठरले. या स्पर्धेत 8 संघ सहभागी झाले होते.






















Join Our Whatsapp Group