पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघ एकूण २ हजार ५०४ मतदान केंद्र अाहेत. त्यापैकी २०८ मतदान केंद्रांची वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या केंद्रांवर ‘करडी नजर’ ठेवण्यात येणार आहे. तसेच कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले जाणार आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघ एकूण २५०४ मतदान केंद्र आहेत. त्यापैकी २०८ मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहेत. पनवेलमध्ये सर्वाधिक ५८ मतदान केंद्रांचा त्यात समावेश आहे. तर सर्वात कमी ९ मतदान केंद्र चिंचवड मधील आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या चित्रीकरण जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दिसणार आहेत. पनवेलमधील ५८, कर्जत ३५, उरण २९, चिंचवड ९, पिंपरी ४० असे एकूण २०८ मतदान केंद्रांचे कॅमेराद्वारे चित्रीकरण केले जाणार आहे.
मावळ लोकसभा मतदार संघासाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी केवळ नऊ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने देखील निवडणूक प्रक्रियेची तयारी पूर्ण केली असून मतदानासाठी निवडणूक विभाग सज्ज झाला आहे.