वाकड (Pclive7.com):- शिवानंद गिरी बाबा यांच्या बरोबर साताऱ्यातील नांदगिरी व जरेंडेश्वर पर्वतावर जाण्याचा योग आला. परंतु पर्वतावर चढताना झालेली दमछाक आणि वाढलेले वजन त्यामुळे फिटनेस विषयी विचार करायला भाग पाडले आणि त्यातूनच मित्र दत्ता शिंदे यांच्याकडून प्रेरणा घेऊन वाकड येथील ट्रेकर्स प्रशांत विनोदे यांनी सिंहगड ट्रेंकिंगचा प्रवास फेव्रुवारी २०१० पासून सुरु केला. त्यांनी आपला ५०० वा ट्रेक पूर्ण करत ‘भीमपराक्रम’ केला आहे.
५०० वेळा सिंहगड ट्रेक करण्याची कामगिरी केलेले प्रशांत विनोदे म्हणाले की, सुरुवातीच्या काळात मित्र महेश राजाराम यादव, यांनी मोलाची साथ दिली. सिंहगड ट्रेंकिंग आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनून आठवड्यातून एकदा सिंहगडचा ट्रेक हा नियमच बनला. “सिंहगड ट्रेकर्स” नावाचा ग्रुप स्थापन झाला. त्यामध्ये अरुण बोरकर (मामा), वैभव माळी, उत्तम ढेरे, निलेश कुंभार, संतोष चिंचवडे, आर्यन मॅन अभी लोंढे, गणेश भुजबळ, रामदास काटे, हेमंत पाडुळे, सुनील साठे, सागर भोंडवे, सचिन कणसे, ज्ञानदेव हांडे, सचिन वाकडकर,पोपट कलाटे, गणेश वाकडकर, जीवन कस्पटे, अनिकेत जाधव मित्रांची यादी वाढत गेली. सर्वच मित्र हितचिंतकांची कायमच मोलाची साथ मिळत गेली. यामध्ये माझा मावस भाऊ उपायुक्त सुनील काशिद पाटील यांच्या सूचनेवरून सिंहगड बरोबर इतर हि ट्रेकर्स चालू केल्याचे त्यांनी सांगितले.
आजपर्यंत विनोदे यांनी अमरनाथ यात्रा २ वेळा, पन्हाळा, पावनखिंड पदभ्रमंती मोहीम ५ वेळा, कात्रज सिंहगड ट्रेक ३ वेळा, ब्रम्हगिरी परिक्रमा ३ वेळा, गिरीनार पर्वत,किल्ले रायगड ३ वेळा, किल्ले तोरणा ३ वेळा, हरीश्चंद गड २ वेळा, कळसुबाई शिखर २ वेळा, किल्ले खांदेरी व उंदेरी, किल्ले रोहीडा,रायरेश्वर, केंजळगड, किल्ले रंगणा, किल्ले तुंग, किल्ले तिकोणा, किल्ले लोहगड, किल्ले विसापूर, खांडस भिमाशंकर ट्रेक किल्ले जंजिरा, किल्ले रायगड ३ वेळा, सांदण व्हॅली ट्रेक, रतनगड,किल्ले वासोटा, किल्ले हरिहर,किल्ले पुरंदर, किल्ले शिवनेरी ३ वेळा, किल्ले चावंड, भोरागिरी भीमाशंकर ट्रेक, किल्ले रेवदंडा, किल्ले राजमाची श्रीवर्धन व मनरंजन, किल्ले पद्मदुर्ग, किल्ले प्रतापगड, किल्ले घनगड, आंदरबन जंगल ट्रेक, कोलाईचा किल्ला नाणेघाट व जीवधन गड सिंधुदुर्गचा किल्ला, घोसाळगड, अवचित गड, सुधागड, धर्मवीर गड, सरसगड उंबराखिंड, कमळगड, ढाकभैरी, किल्ले हडसर, किल्ले अलंग मदन कुलंग, भटकंती करण्याचा योग आला. महाराष्ट्राबरोबर इतर राज्यातीलही किल्ले व भटकंती पूर्ण केली. गोव्यातील फोंडा किल्ला कर्नाटकातील चित्रदुर्ग, मिराजनफोर्ट मेडीकेरी फोर्ट, तमिळनाडूतील वेल्लोरचा किल्ला, जिंजीचा किल्ला, कृष्णगिरी, उत्तर प्रदेशातील झाशीचा किल्ला, राजस्थानातील मेहरागड, गोल्डन फोर्ट, चित्तोडगड, कुंभलगड, अजमेर फोर्ट, जुनागड फोर्ट, नहारगड आदि ठिकाणी भटकंती व ट्रेक केला आहे.
पुढे बोलताना विनोदे म्हणाले की, भारताबरोबर परदेशातील काही किल्ले पाहण्याचा योग आला. भूतानमधील पुणाका फोर्ट, पारो फोर्ट युरोपमधील प्राग येथील फोर्ट पाहण्याच्या योग आला. ट्रेकिंग बरोबर पर्यटनाचीही आवड वाढत गेली. त्यातूनच महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, दिल्ली, हिमाचल, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पोंडेचेरी, केरळ, उत्तरांचल, जम्मू-काश्मीर येथील भटकंती पूर्ण केली. परदेश दौऱ्यामध्ये स्विझर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, हॉलंड, चेक रिपब्लिक, दुबई, थायलॅंड,मलेशिया, सिंगापूर, भूतान असे पर्यटन केले. तसेच फिटनेसच्या आवडीमुळे आतापर्यंत १४ मेराथॉन (२१ किलो मीटर) पूर्ण केले आहे.
५०० वा ट्रेक पूर्ण करते वेळी अनेक संस्थाचे शिलेदार उपस्थित होते. वृक्षवल्ली परिवाराचे ऋषिकेश पाटील, किशोर पारसेवर, जितेंद्र वाडेकर, अजय मूनगेड व इतर सदस्य उपस्थित होते. यंगस्टर स्पोर्ट क्लबचे संजोग तापकीर,सुमित तापकीर, सुयोग्य तापकीर, रिया गायकवाड आदी सदस्य उपस्थित होते. तर कुटुंबातील सीमा विनोदे, उदय विनोदे, दिग्विजय विनोदे, पृथ्वीराज विनोदे, अजिंक्य बालवडकर, चंद्रकांत बालवडकर, विद्या बालवडकर, महेश निम्हण, अमृता निम्हण, शिवबा निम्हण, तसेच हिंद मित्र मंडळाचे संतोष बोडके, दीपक तरस, विनायक राऊत सिंहगड ट्रेकर्सचे अरुण बोरकर, वैभव माळी, उत्तम ढेरे, निलेश कुंभार, सुनील साठे, अभि लोंढे, सचिन कणसे, पोपट कलाटे, आशिष पाटील, मिलिंद मराठे या सर्वांनी शिवरायांची प्रतिमा व पुष्प गुच्छ देऊन विनोदे यांचा सन्मान केला.
सर्व किल्ल्याला भेट देण्याचा मानस
माझा सिंहगडचा ४०० वा ट्रेक माझे वडील दिवंगत ह.भ.य. दतात्रय कोंडीबा विनोदे (नाना) यांच्या स्मृतीस अर्पण केला होता. व २३ मे २०१९ रोजी सिंहगडचा माझा ५०० ट्रेक पूर्ण झालेला आहे. हा ट्रेक मी दिवंगत दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सरांच्या पवित्र स्मृतीस अर्पण करत आहे. भविष्यात सिंहगडच्या नियमित ट्रेक बरोबरच शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रत्येक किल्ल्याला भेट द्यायचा मानस आहे.
– प्रशांत विनोदे,
ट्रेकर्स.
वाकडच्या प्रशांत विनोदेंचा ‘भीमपराक्रम’, ९ वर्षात ५०० वेळा केले सिंहगडचे ‘ट्रेकिंग’






















Join Our Whatsapp Group