दिल्ली (Pclive7.com):- अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ट्रस्ट स्थापन करून राम मंदिर उभारण्याचा आदेश दिला असून मुस्लिमांना अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा देण्याचा आदेश दिला आहे. वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचं सांगण्यात आलं आहे.
राजकीय आणि सामाजिकदृष्टया अतिशय संवेदनशील विषयावरील निकालाचे वाचन सुप्रीम कोर्टात सकाळी साडेदहा वाजता सुरू झाले होते. सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या अधिपत्याखाली ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे ४० दिवस सुनावणी झाल्यानंतर दि.१५ ऑक्टोबर रोजी कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय दिला आहे.