पिंपरी (Pclive7.com):- खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, जगदंब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि स्टार्की फाऊंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत कर्णबधिर तपासणी व डिजिटल श्रवणयंत्र वाटप शिबिर मालिकेतील तिसरे शिबिर भोसरी येथे संपन्न झाले. पंडित गवळी यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन पार पडले.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्या वर्षात एक अभिनव उपक्रम राबविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे यांच्या सहकार्याने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची मोफत श्रवणदोष तपासणी करण्यात आली. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत शिबिरात सहभागी झालेल्या सुमारे २१० ज्येष्ठ नागरिकांची कानांची तपासणी करण्यात आली. अमेरिकेतील स्टार्की फाऊंडेशनच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रत्येक नागरिकाची तपासणी केल्यानंतर श्रवणदोष आढळलेल्या व्यक्तींच्या कानाचे मोजमाप घेण्यात आले. शिबिरात पात्र ठरलेल्या व्यक्तींना डिजिटल श्रवणयंत्र मोफत देण्यात येणार आहे.





















Join Our Whatsapp Group