पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभा युवासेनेच्या पुढाकाराने १० वी तील विद्यार्थ्यांना तणावमुक्तीचे धडे देण्यात आले. फुगेवाडी येथील कै.मीनाताई बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रा. संतोष पाचपुते यांचे व्याख्यान आयोजित केले होते. परिक्षेच्या काळात कोणत्याही गोष्टीचा ताण न घेता विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. इंग्लिश, गणित, विज्ञान या विषयी भीती बाळगू नये. आणि परिक्षाकाळातील अभ्यासाचे नियोजन तसेच महत्वाचे विषयाचे टिप्स प्रा. पाचपुते यांनी दिल्या.
यावेळी मुख्याध्यापिका सौ. पानसरे मॅडम, सामाजिक कार्यकर्ते नंदूभाऊ काची, अविनाश जाधव, भालेराव सर, माने सर, उपस्थित होते. कार्यक्रमचे आयोजन युवासेना विभागसंघटक निलेश हाके यांनी केले होते.