पिंपरी (Pclive7.com):- डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात एका अपघातग्रस्त रिक्षा चालकावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर केलेल्या तपासणीत तो रुग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करणारे ४२ डॉक्टर आणि ५० कर्मचारी हे संपर्कात होते, त्यांना रुग्णालयीन प्रशासनाने इतर कुणाच्याही संपर्कात न येता खबरदारी म्हणून (क्वारंटाईन) सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले आहे.
रुग्णावर शस्त्रक्रिया करीत असताना या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. दोन दिवसांपूर्वी त्या रिक्षाचालकाचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये तो रिक्षाचालक कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णाला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णाच्या संपर्कातील डॉक्टर्स व रुग्णालयीन स्टाफला ‘क्वारंटाईन’ करण्यात आले असून त्याचे सॅम्पल कोरोनाच्या तपासणी करता प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. याबाबतची माहिती अधिष्ठाता डॉ. जे एस भवाळकर यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group