पिंपरी (Pclive7.com):- मदत नाही कर्तव्य.. या भावनेतून रमजान ईदच्या निमित्ताने पिंपरी युवासेना व आशीर्वाद महिलाच्या वतीने फुगेवाडी मधील मुस्लिम बांधवाना अन्नधान्याचे आज वाटप करण्यात आले.
शिवसेना जिल्हासंघटिका सुलभा उबाळे यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु करण्यात आलेल्या गरजू व गरीब लोकांना मोफत भोजन, अन्नधान्य वाटप, मास्क व सॅनिटायझर वाटप ह्या कार्यक्रमाला आज दोन महिने पूर्ण होऊन दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. यावेळेस पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, शीला मामी जाधव, नंदूभाऊ काची,अंकुश जाधव, रुपेश भाऊ गायकवाड, महेश बोधले, उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group