पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने ‘ऑनलाईन नोकरी’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे यांनी दिली.
आज दि.१४ जून रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड विद्यार्थी सेनेकडून महाराष्ट्रातील बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव थांबविण्याकरिता अनेक उपाययोजना करण्यात आल्या असल्याने अनेक दिवसापासून व्यवसाय कारखाने उद्योगधंदे बंद आहेत. बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर असंख्य परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाले आहे. सध्या महाराष्ट्रातील औद्योगिक कंपन्यांनाही मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या सर्व परिस्थितीत युवक-युवतींना रोजगाराच्या नवीन संधी या ऑनलाईन नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. कष्ट करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम करण्याची संधी या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार आहे. या संधीचा उपयोग गरजू बेरोजगार युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहन मने विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group