पिंपरी (Pclive7.com):- कोरोना सारख्या भयंकर परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवड शहरात प्राथमिक शिक्षक हे सर्वेक्षणाचे काम करत आहेत. मात्र, गेले अनेक महिने महापालिका प्रशासनाअंतर्गत काम करणाऱ्या सुमारे १५०० प्राथमिक शिक्षकांचा रखडलेला ७ व्या वेतन आयोगाच्या अंमलबाजावणीचा प्रश्न अखेर आता सुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ पावर यांनी याबाबत महापालिका प्रशासनकडे पाठपुरावा केल्यानंतर शिक्षकांच्या सदर मागणीस यश मिळाले असून, शिक्षक संघटनेने पार्थ पवार यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, दि. २ ऑगस्ट २०१९ पासून नगर विकास विभागाचा महानगरपालिका प्राथमिक शिक्षकांना आयोग लागू करण्याचा शासन निर्णय निर्गमीत होऊनही प्रत्यक्षात शासन निर्णयातील त्रुटींमुळे वर्ष होत आले तरीही प्रत्यक्षात शिक्षकांना कुठलाही लाभ मिळाला नव्हता. त्यामुळे शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी युवा नेते पार्थ पवार यांनी संबंधित प्रशासनाला कार्यवाहीबाबत सूचना करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार दोनच दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर आणि पार्थ पवार यांची सविस्तर बैठक झाली. त्यावेळी आयुक्त हर्डिकर यांनी शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत आश्वासन दिले होते.
तर, ७ वा आयोग लागू करण्यासाठी पदवीधर शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱयांच्या समवेत आयुक्त यांच्या दालनात बैठकीचे आयोजन होऊन २ फेब्रुवारी २०२० रोजी मनपा प्राथ. शिक्षकांना आयोग लागू करण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला होता. मात्र, शिक्षकांना न्याय मिळाला नाही. अखेर शासनाच्या शासन निर्णयातील त्रुटीची दुरुस्ती वा शुद्धीपत्रक शासनाकडून सद्यस्थितीत होण्याचे चिन्ह दिसत नसल्याने मनपा स्तरावरच साधारण १५०० कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांच्या वेतनश्रेण्या पडताळणी करून मान्यतेसाठी शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींनी पार्थ पवार यांच्याकडे मदतीसाठी मागणी केली होती.




















Join Our Whatsapp Group