पिंपरी (Pclive7.com):- एकीकडे पवना धरण शंभर टक्के भरले असताना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा खेळखंडोबा सुरू आहे. शहराचा पाणीपुरवठा दुरूस्तीच्या कारणामुळे गुरूवारी रोजी बंद होता. तरी देखील रावेत पंपिंग स्टेशनचा फिडर अचानकपणे (शुक्रवारी दि.०४) रोजी नादुरूस्त झाला आहे. त्यामुळे आज शनिवारी दि.०५ सप्टेंबर रोजी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने रात्री उशीरा दिली आहे.
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल दि.०४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता MSEDCL चा फिडर नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्र येथील विद्युत पुरवठा खंडित होऊन संपूर्ण पंपिंग बंद झाले आहे. या कारणास्तव शहरातील आजचा म्हणजेच (शनिवार दि.५ सप्टेंबर २०२०) रोजीचा दिवसभराचा तसेच उद्या, (रविवार दि.६ सप्टेंबर २०२०) रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहील.
MSEDCL मार्फत दुरुस्तीचे काम सुरु असून विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्यावर पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचा विभागाचा प्रयत्न राहील. तरी, नागरिकांनी याची नोंद घेऊन उपलब्ध पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे.























Join Our Whatsapp Group