पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड परिसरातील निगडी, ओटास्कीम येथे गुन्हेगाराने त्याच्याकडील पिस्तुलातून फायरींग केले आहे. यामध्ये एक जखमी झाला आहे. एकाला दगडाने मारहाण करण्यात आलेली आहे.
आकाश दोडमने (३०, रा. ओटास्कीम, निगडी) याच्यावर गोळीबार करण्यात आलेला असून त्याच्या पायाला गोळी लागली आहे. तर आकाशचा भाऊ रवी याला दगडाने आणि दांडक्याने मारहाण करुन जखमी केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश आणि रावण गँग मधील किरण खवले या दोघात मारामारी झाली होती. तेंव्हापासून दोघांमध्ये वाद सुरु होते. याच वादातून बुधवारी रात्री सव्वा आकराच्या सुमारास ओटास्कीम बिल्डींग ३ व ४ समोर हा प्रकार घडला.
किरण खवले हा त्याचे सहा, सात साथीदारांसह हत्यारे घेऊन तेथे आला. यावेळी झालेल्या वादातून आकाश याच्या पायावर गोळीबार करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यातील संशयित चार जणांना ताब्यात घेतले आहे.






















Join Our Whatsapp Group