पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे थेरगाव येथील केजुबाई उद्यान आणि थेरगाव बोट क्लब नागरिकांसाठी पूर्ण क्षमतेने खुले करण्यात आला आहे.
कोरोना महामारीमुळे गेल्या ११ महिन्यापासून हे बोट क्लब बंद ठेवण्यात आले होते. थेरगाव बोट क्लब हे शहरातील एकमेव बोटिंगचा आनंद घेण्याचे ठिकाण आहे. बोट क्लबमध्ये २० पेडल बोट तर १४ सिटरची एक मोटर बोट पर्यटकांच्या सेवेस सज्ज आहे.
हे उद्यान शहरातील सर्वाधिक सुंदर व आकर्षक आहे. सकाळी ११ ते ६ या वेळेत उद्यान खुले राहणार आहे. या उद्यानामध्ये लहान मुलांसाठी आकर्षण असलेली झुकझुक गाडी देखील सुरू करण्यात आली आहे. कोरोना पूर्णपणे न संपल्याने येणाऱ्या नागरीकांनी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असल्याची सूचना महापालिकेने केले आहे.
कोरोना काळात नागरिकांच्या मनावर आलेली मळभ दूर करण्यासाठी या उद्यानाचा एकावेळ नक्कीच आनंद घ्यावा. असे आवाहन सनी बोट क्लबचे संचालक सनी सॅबेस्टीयन यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group