पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खाजगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश प्रक्रिया संबंधी आम आदमी पार्टीतर्फे आकुर्डी येथे (दि.१२) रोजी पालकांची मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.
आरटीई ऍक्ट २००९ नुसार महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना नर्सरी ते पहिलीच्या प्रवेशासाठी खाजगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवरती शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये मोफत प्रवेशासाठी शासनाने प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.
सर्वसाधारण कुटुंबातील पालकांना ऑनलाईन प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रासंबंधी या कार्यशाळेमध्ये आपचे पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी पालकांना मार्गदशन केले.
आरटीईसाठी करावयाच्या अर्ज प्रक्रिया तसेच प्रवेश घेतेवेळी शाळांकडून पालकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे मार्फत सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही सुभाष चौधरी यांनी केली.
आरटीई प्रवेशासाठी पालकांना नोंदणी करण्यासाठी आकुर्डी येथील जनसंपर्क कार्यालयांध्ये संपर्क करावा असे आवाहन आप पुणे जिल्हा युवाध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांनी केले.























Join Our Whatsapp Group