पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशन यांच्यावतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ९६ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. व ५० ज्येष्ठ नागरीकांनी मोफत आरोग्य तपासनी शीबीर मध्ये सहभाग नोंदवला.
यावेळी नवचैतन्य क्रीडा प्रतिष्ठान अध्यक्ष प्रसाद कुंजीर, क्रांती मित्र मंडळ अध्यक्ष स्वप्नील काटे, श्री काळभैरवनाथ कब्बडी संघ रहाटणी अध्यक्ष आदिनाथ नखाते, महाराष्ट्र कब्बडी संघ रहाटणी अध्यक्ष अमित नखाते या मंडळाच्या अध्यक्ष व सभासदांच्या हस्ते उद्घाटन व शिबिराची सुरुवात करण्यात आली.
यावेळी उन्नती सोशल फाऊन्डेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, संस्थापक संजय भिसे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, पवना बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, स्वराज नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील कुंजीर, पि.के. स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे, सामाजिक कार्यकर्ते शंकर चोंधे, उद्योजक राजू भिसे, उमेश शेलार, विजयकांत डुरे ,अतुल पाटील, रोहिदास गवारी, राजेंद्र जयस्वाल, विकास काटे, प्रसाद कुंजीर, यांचा हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
त्यावेळी नगरसेविका निर्मला कुटे, कुंदन झिंजुर्डे, राजू शेलार, गौरी कुटे ,श्री विठाई मोफत वाचनालयातील सर्व सभासद व इतर नागरिक उपस्थित होते. अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाउंडेशन यांचे सभासदही हजर होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कुंदा भिसे म्हणाल्या, सध्या कोरोना महामारीचा कार्यकाळ सुरु आहे. अनेक रुग्णांना रक्ताची गरज सतावत आहे. म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त रक्त संकलन करण्याचे ठरविले व त्याला परिसरातील अनेक नागरिकांनी साथ दिली. म्हणून आम्ही ९६ बॉटल रक्त संकलित करू शकलो. नागरिकांनी सामाजिक उपक्रम राबविताना समाजाला उपयोग होईल असे कार्यक्रम राबवावीत असे वाटते.






















Join Our Whatsapp Group