पिंपरी (Pclive7.com):- पवना नदी मध्ये वाढत्या जलपर्णीमुळे डासांचे प्रमाण वाढले असल्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढत आहे. डासांमुळे नागरिक हैराण आहेत. नदी काठच्या सर्व परिसरात औषध फवारणी करून नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेने दिला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नदीपात्रातील जलपर्णी काढून फुगेवाडी – दापोडी – कासारवाडी परिसरात धूर फवारणी व औषधं फवारणी करून नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यात यावा. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे निवेदन ह प्रभाग क्षेत्रीय अधिकारी अभिजित हराळे यांना पिंपरी युवासेना व मैत्री ग्रुप च्या वतीने देण्यात आले.
ह्यावेळी पिंपरी युवासेनेचे पिंपरी विभागसंघटक निलेश हाके, रवी कांबळे, अक्षयदादा गायकवाड, दीपक साळवे, मोसीन मुजावर, अतुल जाधव, राजू तावस्कर उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group