पिंपरी (Pclive7.com):- छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन ,प्रशिक्षण संस्था (बार्टी) व न्यू सिटी प्राईड स्कुलच्या वतीने गोविंद यशदा चौक येथील शिव छत्रपती लिनिअर अर्बन गार्डन येथे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे बार्टीचे महासंचालक धम्म ज्योती गजभिये यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.
यावेळी न्यू सिटी प्राईड स्कुलचे चेअरमन अरुण चाबुकस्वार, मुखाद्यपिका आसावरी घोडके, शिक्षक, कर्मचारी व बार्टीचे प्रकल्प अधिकारी शितल बंडगर, समतादुत प्रशांत कुलकर्णी, संगीताताई शहाडे, सामाजिक कार्यकर्ते अमोल घोलप, शशी जाधव, रोहिदास भालेराव, रहीम शेख, संदीप चाबुकस्वार, सचिन आवटे, बी.एस.कांबळे, इरफान शेख, संतोष जगताप इतर मान्यवर उपस्थित होते.
मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आपल्या देशावर ओढवले आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना व्हेंटिलेटर अभावी प्राण गमवावे लागले. तसेच निसर्गाची झपाट्याने होत असलेली हानी यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. दररोज हजारो वाहनांमधून येणारा कार्बनडाय ऑक्सइड वायुचा वातावरणात परिणाम होत आहे. हे तापमान आणि प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात आला.





















Join Our Whatsapp Group