पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर मध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांची पिंपरी चिचंवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे हे देखील उपस्थित होते.
पिंपळे सौदागर येथील आरक्षण क्र.३५१ अ मधील योगा पार्क उद्यान, १८ मीटर कुणाल आयकॉन रोड, तसेच मिलेटरीचा १८ मीटर रस्ता आदी विकास कामांची पाहणी करण्यात आली.
नाना काटे यांनी मिलिटरी रस्त्याच्या पाहणीवेळी कुंजीर चौक येथे मिलिटरी रोड व कुणाल आयकॉन रोड यांना जोडण्यात येणाऱ्या लिंक रस्त्याची जागा संबंधित जागा मालकांना योग्य मोबदला देऊन रस्त्याची जागा ताब्यात घेऊन काम सुरू केल्यास कुणाल आयकॉन रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न लवकर सुटेल, तसेच पिंपळे सौदागर मधील इतर ताब्यात नसलेले डिपी रस्त्यांची जागा ताब्यात घेण्यासाठी संबंधित जागा मालाकांशी प्रत्यक्ष भेटून संबंधित अधिकारी यांनी बैठक घेऊन योग्य तो मोबदला लवकर द्या, आणि रस्ते विकसित करा. अशा सूचना विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आयुक्तांना सूचना केल्या.
त्यानंतर आयुक्तांनी संबंधीत अधिकारी व ठेकेदार यांना सदरील रस्त्याचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच डिपी रस्त्याबाबत बैठकीचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या.
या पाहणी वेळी स्मार्ट सिटीचे जनरल मॅनेजर अशोक भालकर, कार्यकारी उपअभियंता मनोज सेठिया, शिर्के कंपनीचे जनरल मॅनेजर केशव लावंड, प्रोजेक्ट मॅनेजर टी.के चव्हाण, स्थापत्य विभागाचे शाखा अभियंता नरेश जाधव आदी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group