पिंपरी (Pclive7.com):- भोसरी परिसरातील प्रसिद्ध, गेल्या २५ वर्षाचा प्रदिर्घ असा अनुभव असलेले कृष्णा ग्रुपचे देसाई ॲक्सिडेंटल हॉस्पिटल नवीन अद्यावत स्वरूपात रूग्णांच्या सेवेसाठी कार्यान्वित झाले आहे.
बुधवार दि.०१ सप्टेंबर २०२१ रोजी हे नवे हॉस्पिटल पुन्हा रूग्ण सेवेसाठी सज्ज झाले आहे. २४×७ तत्पर आणि विश्वसनीय रूग्ण सेवा देण्यासाठी या हॉस्पिटलची टीम सज्ज झाली आहे.
या हॉस्पिटलचा भोसरी परिसरातील मोशी, संभाजीनगर, कृष्णानगर, दिघी, चऱ्होली मधील नागरिकांना निश्चित फायदा होणार आहे.अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या आणि संचालिका सौ. किर्ती मारुती जाधव, डॉ. नंदकुमार माळशिरसकर, डॉ. सुप्रिया म्हस्के, डॉ. प्रसाद वर्पे, डॉ. स्नेहल चौधरी यांनी दिली.
या हॉस्पिटलला भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, डॉ. विनायक पाटील, pmpml चे अधिकारी चंद्रकांत वर्पे, नगरसेवक कुंदन गायकवाड, शिवराज लांडगे. सौ. सोनम रवी जांभुळकर आदी मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.