पिंपरी (Pclive7.com):- भीमगर्जना मित्रमंडळ विश्वस्थ संस्था आणि माता रमाई महिला बचत गटाच्या माध्यमातून जेतवण बुद्धविहार वेणुनगर वाकड येथे राजमाता जिजाऊ, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, मातोश्री रमाई आंबेडकर आणि संत रोहिदास महाराज यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. तसेच यावेळी महिला मेळावा देखील मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी प्रबोधनकार शारदाताई मुंडे यांनी ‘मी जिजाऊ, सावित्री, रमाई बोलतेय’ हे प्रबोधनपर एकपात्री नाट्य सादर केले. यावेळी सर्व धर्मीय महिला व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थित महिलांना बौद्ध वंदना आणि संस्कार पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आली.
महिलांनी आपल्या कुटूंबातील मुलां-मुलींवर राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि करोडो दलितांची माता रमाई आंबेडकर व संत रोहिदास यांच्या विचारांचे संस्कार करावेत. आणि आपल्या पुढील पिढीला महामातांच्या विचारांचे देशभक्त बनवावे असा संदेश संस्थेचे अध्यक्ष बी.जी. सुर्यवंशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आणि स्थानिक नगरसेविका ममताताई गायकवाड, नगरसेविका आश्विनीताई वाघमारे यांनी महिलांना त्यांच्या निरोगी व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयंत मरळीकर यानी केले.
तर कार्यक्रमाचे नियोजन बाबासाहेब साळवे, प्रशांत जाधव, संतोष गायकवाड, शाम सोनावणे, अप्पासाहेब परिहार, अमोल म्हस्के, बालाजी कांबळे, अरुण सोनवणे, तुषार भिंगारे, विजय खरात, संजय वाघमारे, आनंद जाधव, दीपक कांबळे, अमृत धेबडे, हरिभाऊ निकाळजे, अनिल साळवे, रावसाहेब जोगदंड, प्रियांका भिंगारे, गौरीताई चौधरी, प्रतिक्षा साखरे, आश्विनी कांबळे, वृषाली भिंगारे, इंदुताई परिहार, कविता, स्नेहा भिंगारे, कांबळे या सर्वांनी मिळून केले.


























Join Our Whatsapp Group