पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग यांच्या अंतर्गत स्वछता उपक्रम पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील एच.ए. कंपनी मैदान परिसर पिंपरी व स्पाईन रोड चिखली प्राधिकरण येथे घेण्यात आले.

स्वछतादूत पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी रेवदंडा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्म शाब्दीनिमित्त स्वछता मोहीम प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक 1 मार्च रोजी सकाळी 7 ते 9.30 वाजे पर्यंत एच.ए.कंपनी मैदानच्या 14 हजार चौ.मी.परिसरातील व बाजूच्या परिसरात घेण्यात आली. यात महापालिका परिसरातील सर्व श्री सदस्य येथे हजर होते.
यावेळी मैदानात पसरलेला प्लस्टिक व इतर टाकाऊ प्रकारचा सर्व कचरा जमा करण्यात आला. त्याच प्रमाणे लागेल त्या ठिकाणी झाडूने ही साफसफाई करण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व इतर प्रकारचे कचऱ्याचे संकलन करण्यात आले. व तो कचरा महापालिकेच्या कचरा वाहक गाडीमध्ये योग्य त्या ठिकाणी पाठवण्यात आला.
या कामासाठी बैठकीतील सदस्यांचे टेम्पो व इतर साहित्य आणले होते. व यासाठी 15 कचरा वाहक गाड्या पालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यावेळी अंदाजे 25 टन सुका कचरा व 3 टन ओला कचरा संकलित करून योग्य त्या ठिकाणी पाठवण्यात आला. यावेळी पालिका अधिकारी देखील यात सामील झाले होते. तसेच परिसरातील बहुसंख्य लोकांनीही उस्फूर्तपणे अभियानात सहभाग घेतला होता. तसेच बैठकीतील 1015 श्रीसदस्य हजर होते. यावेळी श्री सदस्यांनी लोकांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगण्यात आले व स्वछता का महत्वाची आहे हे ही पटवून सांगितले. यावेळी सरकारने सांगितलेल्या कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
क प्रभागाच्या परिसरात आयोजित या स्वच्छता अभियानामध्ये महापालिकेचे आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ.के अनिल रॉय ,सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे,सहाय्यक आरोग्य अधिकारी बी बी कांबळे,गणेश देशपांडे पिंपरी-चिंचवड व चाकण परिसरातील एक हजार स्वयंसेवकानी सहभाग घेतला व परिसरात स्वच्छता केली.






















Join Our Whatsapp Group