पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पिंपरी विधानसभेतील विभाग प्रमुख विभाग संघटक तसेच शाखाप्रमुख समन्वयक इतर पदांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे, राज्य संघटक गोविंदजी घोळवे, पिंपरी चिंचवड संपर्कप्रमुख वैभवजी थोरात, महिला संपर्क संघटिका वैशालीताई सुर्यवंशी. भोसरी विधानसभा संपरकप्रमुख केसरीनाथ पाटील, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख सचिन भोसले, उपजिल्हा संघटिका वैशाली मराठे, शहरसंघटिका उर्मिला काळभोर, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, पिंपरी विधानसभा संघटिका सरिता साने, नगरसेवक प्रमोद कुटे, शहरसंघटक रोमी संधु, बशीर सुतार, विशाल यादव, जेष्ठ नेते मधुकर बाबर, उपस्थित होते,
पिंपरी विधानसभेत शिवसेनेची ताकद वाढवण्याची जबाबदारी समजुन कामाला लागणार असलयाचे यावेळी नवनियुक्त पदाधिकारी गणेश आहेर यांनी संगितले.