पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभागरचनेच्या प्रारूप आराखड्याबाबत तब्बल ५ हजार ६८४ हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यावर राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्यासमोर शुक्रवारी (दि.२५) सुनावणी झाली. त्याचा अहवाल मंगळवारी (दि.२) राज्य निवडणूक आयोगास सादर करण्यात आला आहे. त्यामुळे अंतिम प्रभागरचनेची उत्सुकता लागली आहे.

महापालिकेने प्रभागरचनेचा आराखडा दि.१ फेब्रुवारीला प्रसिद्ध केला. त्यावर दि.१४ फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकती मागवून घेण्यात आल्या. त्यात विक्रमी संख्येने ५ हजार ६८४ हरकती प्राप्त झाल्या. त्यावर अनिल कवडे यांच्यासमोर शुक्रवारी दिवसभर सुनावणी झाल्या. त्यांचा अहवाल राज्य निवडणूक आयोगास पाठविण्यात आला. आता प्रभागरचनेस अंतिम मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा लागली आहे.
आठवड्याभरात प्रभागरचनेला अंतिम मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर एससी, एसटी व महिला आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे.
Tags: PCMCPcmc Election NewsPcmc newsPimpri Chinchwadअंतिम प्रभाग रचनापिंपरी चिंचवड महानगरपालिकाप्रभाग रचनामहापालिका निवडणूक





















Join Our Whatsapp Group