पिंपरी :- भाजी विक्रेत्याने एका १५ वर्षीय मुलीचा गळा आवळून मृतदेह खड्ड्यात पुरून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार तब्बल चार दिवसांनी आज उघडकीस आला आहे. रविवारी रात्री पिंपरी भाजी मंडईमध्ये हा प्रकार घडला. या सर्व प्रकरणाची माहिती खुद्द भाजी विक्रेत्यानेच दिली आहे. रफिक नावाच्या या भाजी विक्रेत्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रफिक याचा भाजी विक्रीचा गाळा पिंपरी भाजीमंडईमध्ये आहे. रविवारी रात्री रफिकने साक्षीला गाळ्यात बोलावून घेतले. तेथे तिचा गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दुकानात खड्डा काढून पुरून टाकला. दरम्यान साक्षीच्या पालकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती. पोलिस तपास करत असताना गुरुवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. मृतदेह अजूनही बाहेर काढण्यात आलेला नसून तो तहसीलदारांनी पाहणी केल्यानंतर तो बाहेर काढण्यात येईल. या प्रकरणाचा तपास करत पिंपरी पोलिस आहेत.
दरम्यान, अनैतिक संबंधातून हा खून केल्याचे संशयित आरोपीने पोलिसांना सांगितले.






















Join Our Whatsapp Group