पिंपरी (Pclive7.com):- अवैध गुटखा विक्री प्रकरणी पोलिसांनी चाकण, चिखली आणि वाकड येथे ४ ठिकाणी कारवाई केली. याप्रकरणी गुरुवारी (दि.३०) संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली कारवाई महाळुंगे पोलिसांनी खराबवाडी येथे केली. संदीप बुधाजी बुरांडे (३५, रा, निघोजे, ता. खेड) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ६५ हजार १९७ रुपयांचा तंबाखूजन्य गुटखा जप्त केला आहे.
दुसरी कारवाई गुन्हे शाखा युनिट तीनने आंबेठाण चौक चाकण येथे केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी ९१ हजार ८६ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी ललितकुमार लक्ष्मीकांत गंजेवार (५१, रा. आंबेठाण चौक, चाकण), हनुमान चौधरी, ओमप्रकाश बिष्णोई उर्फ ओमजी (दोघे रा. खालूंब्रे, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ललितकुमार याला पोलिसांनी अटक केली आहे.
तिसरी कारवाई गुन्हे शाखा युनिट एकने म्हेत्रेवस्ती येथे एका पान टपरी मध्ये केली. सिद्धेश्वर दिनकर खाडे (२६, रा. ताम्हाणेवस्ती, चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचा एकूण चार हजार ४०० रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे.
चौथी कारवाई गुन्हे शाखा युनिट चारने गोडांबे चौक, रहाटणी येथील अमिता पान शॉप येथे केली. मोहम्मद शरीफ कुरेशी (४३, रा. रहाटणी) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १० हजार ३१६ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे.






















Join Our Whatsapp Group