आंबेगाव (Pclive7.com):- आंबेगाव येथील पेठ, सातगाव पठार येथे श्रावण महिन्यातील बैलपोळा सण शेतकऱ्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सातगाव पठारावरील शेती जवळपास सगळीकडेच आधुनिक तंत्रज्ञान वापरून ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करत आहेत. शेतीसाठी बैलजोड्या खुपच कमी आढळत आहेत. आणि अशातच गेले ८ वर्षे बैलगाडा शर्यत बंद होती. कित्येक बैलगाडा मालकांनी आपले दावणीचे बैल नाईलाजाने विकले. बंदीमुळे यात्रा जत्रा व बैलपोळा सारख्या सणाला शेतकऱ्यांचा निरुत्साह होता.

पण गेल्या ८ महीन्या पुर्वी बैलगाडा शर्यत बंदी उठली अन् पुन्हा शेतकऱ्यांच्या दावणीला बळीराजाचा नंदी दिसु लागला. आणि याच बैलांचा एकमेव सण साजरा करण्यासाठी पेठ आणि परिसरातील शेतकरी, बैलगाडा मालकांनी बैलांची वाजत-गाजत, पारंपरिक पद्धतीने, अन् डिजेच्या तालावर ग्रामपंचायत सदस्य संजयशेठ पवळे यांच्या पुढाकाराने सवाद्य मिरवणूक काढली.
शेतकऱ्यांनी बैलांची शिंगे टोकदार करुन अन रंगरंगोटी करून, झाल टाकुन सजवुन आणली होती. भंडारा- गुलालाची उधळण करत संपूर्ण पेठ गावातुन वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. पेठ गावातील तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.





















Join Our Whatsapp Group